मुंबई | कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय तसंच उद्योग धंद्यांवर परिणाम झाल्याचं दिसून आलंय. यासाठी अनेक संघटनांना त्यांच्या मागण्यांसाठी थेट कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर संदीप देशपांडेंनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता म्हणजे कृष्णकुंज, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.
संदीप देशपांडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “समस्या अनेक उपाय एक ,महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता “श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28.” देशपांडे यांचं ट्विट सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे.
लॉकडाऊननंतर राज्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. दरम्यान राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनेकांच्या समस्या सोडवण्यात देखील आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरलाय?- निलेश राणे
“बिहार निवडणुकीदरम्यान राहूल गांधी शिमल्यात लुटत होते पिकनीकची मजा”
विराट कोहली अनुष्काचा कुत्रा; काँग्रेस प्रवक्त्याकडून उल्लेख!
“मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार, मात्र नियंत्रणाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल”
पुणे पुन्हा हादरलं, ‘या’ संघटनेच्या प्रमुखाची धारदार शस्त्रांनी वार करुन हत्या