बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशासमोर नवं संकट! ‘या’ राज्यात सापडला कोरोनाचा नवा व्हेरियंट

बंगळूरू | गेल्या दीड वर्षापासून आपण सर्वजण कोरोना महामारीविरोधात लढत आहोत. सध्या विविध राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यानं निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कर्नाटक सरकारनं सुद्धा बहुतांश विभागात आणि घटकांवर लावलेले निर्बंध शिथिल केले आहेत. लसीकरणावर सर्वत्र भर देण्यात येत आहे. अशातच कर्नाटकमधून सर्वांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.

कर्नाटकमध्ये कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. राज्यात सध्या कोरोनाचा नवा व्हेरियंट समोर आल्याचं लक्षात येत आहे. ए.व्हाय 4.2 हे या नव्या कोरोना प्रकराचं नाव आहे. आतापर्यंत कर्नाटकमध्ये या प्रकारचे 7 रूग्ण आढळल्यानं सर्वत्र चिंता पसरली आहे. या नव्या प्रकराचे असेच रूग्ण सापडत राहिले तर कर्नाटकला तिसऱ्या लाटेला सामोर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनाचे वेगवेगळे प्रकार नागरिकांच्या आरोग्याला त्रासदायक ठरले आहेत. कर्नाटकमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या ‘ए व्हाय 4.2’ या नव्या प्रकारामुळं राज्यात चिंता परसली आहे. ‘ए व्हाय 4.2’ प्रकारचे राज्यात आतापर्यंत 7 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 3 रुग्ण बंगळूरू आणि इतर रुग्ण राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत. कोरोनाच्या या नव्या प्रकाराबाबत राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या कोरोनाच्या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी कठोर उपायोजना आखण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, असंही बोम्मई म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी सरकार लसीकरणावर भर देत आहे. पहिला डोस घेतलेल्यांनी आणि डोस न घेतलेल्यांनी सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे. सोशल डिस्टींगचं पालन करणं, सतत हात धुणं, मास्कचा वापर करणं या उपाययोजना करत राहिल्यानं आपण कोरोनाला स्वत: पासून लांब ठेवू शकतो.

थोडक्यात बातम्या 

इम्रान खानच्या अडचणीत वाढ! पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नी भिडले

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत किरण गोसावी लखनऊमधून फरार

मलिकांनी घेतली मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट; मुंबई पोलीस दलात हालचालींना वेग

“…म्हणून किशोरी पेडणेकर यांनी राजीनामा द्यावा”

“भारतीय चित्रपट सृष्टीला तातडीने स्वच्छ करण्याची गरज, इथं सर्वात जास्त…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More