बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवजयंती उत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे नवे निर्देश, अशी असेल नियमावली

मुंबई | रयतेच्या राजाची जयंती लवकरच येत आहे. राज्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथ असल्यानं शिवजयंतीवर निर्बंध लावावे लागत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शिवज्योत दौडीमध्ये 200 जण आणि शिवजयंती सोहळ्याला 500 जणांना उपस्थित राहता येणार, या गृहविभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. 500 जणांना उपस्थित राहता येणार असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सर्व आरोग्य नियमांचे पालन करून आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींच्या जन्मसोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी शिवज्याेत आणि जन्मोत्सव सोहळ्यामधील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.

राज्यात दोन दोन शिवजयंती नको, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीला म्हणजेच जन्मतारखेनुसार साजरी करावी, अशी मागणी शिवसेना आमदार मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.  शिवजयंतीच्या दोन तारखा आणि वाद सोडविण्यासाठी 1966 मध्ये महाराष्ट्र सरकारने इतिहास कारांची एक समिती नेमली होती. मात्र, या नेमलेल्या समितीमध्ये शिवरायांची जयंती एकाच तारखेला साजरी करावी, अशी एकवाक्यता झाली नाही.

दरम्यान, 2000 साली आमदार रेखाताई खेडेकर यांनी विधीमंडळामध्ये विविध पुरावे आणि 1966 साली समितीचा अहवाल मांडून 19 फेब्रुवारी 1630 हा महाराजांचा जन्मदिवस असल्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यास सभागृहाने मान्यता दिली होती . छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन जयंती साजरी करण्यासाठी मराठा संघटनांनी देखील विरोध दर्शविला होता. त्यातच आता एकाच शिवजयंतीसाठी मुख्यमंत्री आमदारांची विनंती मान्य करणार का? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-  

IPl Auction 2022: आयपीएल लिलावात कोणत्या संघानं मारली बाजी, माजी क्रिकेटपटू म्हणतात…

कुडाळ परिसरात शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की, पोलीस घटनास्थळी दाखल

पुष्पाचा जलवा कायम! आता साड्यांमध्येही पहायला मिळणार ‘पुष्पा’ची क्रेझ

मराठा आरक्षणाविषयी संभाजीराजेंची मोठी घोषणा, म्हणाले…

“नाना पटोले वगैरे नौटंकीबाज लोकं आहेत, त्यांनी कितीही…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More