देश

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | काळ आणि गरजेच्या अनुषंगाने स्वतःमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न आहे. नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते.

आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन आणि नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती देखील इथेच झाली व पहिली संसद देखील इथंच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली. आपल्या लोकशाहीची पुर्नस्थापना झाली, असं मोदी म्हणाले.

अनेक वर्षांपासून नव्या संसद भवनाची गरज जाणवलेली आहे. अशावेळी हे आपल्या सर्वांचे दायित्व ठरतं की 21 व्या शतकातील भारताला आता एक नवं संसद भवन मिळावं. याच दिशेने आज हा नवा शुभारंभ होत आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय!

देशातील ‘या’ नऊ राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक

“पोरी उचलायची भाषा करणाऱ्या आमदाराला रक्तदानाचं महत्व काय समजणार?”

‘रावसाहेब दानवेंना घरात घुसून मारायला हवं’; बच्चू कडू भडकले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या