बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे”

मुंबई |  विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधारी चांगलेच एकमेकांवर आक्रमक झाले होते. एवढच नाहीतर विधानसभेच्या अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्कीही झाली. या प्रकरणावरून भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं असून, विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी नेत्यांवर आरोप करायला सुरूवात केली आहे.

अशातच भाजप नेते आणि आमदार अशिष शेलार यांनीही राज्यातील सरकारवर निशाणा साधला आहे. तालिबानी संस्कृतीला लाजवेल असं ठाकरे सरकार वागत असल्याचं शेलार यांनी म्हटलं आहे. आज अशिष शेलार यानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तसेच  ज्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. त्यामध्ये अशिष शेलार यांचाही समावेश असल्याचं समजतं आहे.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या रुपाने नवे तालिबानी महाराष्ट्रावर राज्य करू पाहत आहे. भाजपाच्या कोणत्याही आमदाराने भास्कर जाधवांना शिवीगाळ केली नाही. तालिका अध्यक्षांना कुठेही धक्काबुक्की झाली नसून, ओबीसी आरक्षणात बोलू न दिल्याने संविधानिक त्रागा करणाऱ्या सदस्यांना जागेवर बसवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच उपाध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणारे सदस्य भाजपाचे नव्हते. तरी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना असं वाटत असेल तर पक्षाच्या वतीने क्षमा मागतो, असं आम्ही सांगितलं. परंतु, तरी देखील तालिबानी सरकारने आमच्या आमदारांवर कारवाई केली. असं सांगत सत्ताधाऱ्यांची सभागृहाबाहेर पळता भुई थोडी करू, असा इशाराही आशिष शेलारांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“31 जूलैपर्यंत एमपीएससीच्या रिक्त जागांबाबत केलेली घोषणा फसवी आहे”

12 आमदारांवर झालेल्या कारवाईनंतर भाजपची बैठक; बैठकीकडे सर्वांचं लक्ष

भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

ह्रदयद्रावक! तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या अंगावर कोसळली क्राँक्रीट लिफ्ट, जागीच मृत्यू

नियतीचा खेळ! सासऱ्याचा मृतदेह नेत होता जावई अन्…, एकाच दिवशी माय-लेकी झाल्या विधवा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More