बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नव्या व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढली, प्रवासासह इतरही गोष्टींवर आली बंधनं

नवी दिल्ली | कोरोना महामारीने संपुर्ण जगभरात हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळत असाताना हळूहळू ही रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: सर्वांच्याच नाकी नऊ आणले असल्याचं पाहायला मिळालं होतं.

सध्या संपुर्ण देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका निर्माण झाला आहे. ओमिक्राॅन या नव्या व्हेरिएंटमुळे सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे. नव्या विषाणूमध्ये 50 स्पाईक उत्परिवर्तन उपस्थित असल्याने ते अत्यंत घातक असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही वेगाने याचा संसर्ग पसरत जात असल्याची चर्चा सुरू आहे.

दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर आणि प्रवाशांवर अनेक देशांनी बंदी घातली आहे. तसेच खबरदारीचे उपाय सर्वच देश करताना पाहायला मिळत आहेत. परंतु जागतिक आरोग्य संघटनेने नव्या व्हेरिएंटचा धोका असतानाही दक्षिण आफ्रिकेतील विमानांवर बंदी घालू नये या आवाहनाचं काही देशच पालन करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सरासरी आफ्रिकन देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच यामुळे जगभरातील देश व वैज्ञानिक यांची चिंता वाढवली आहे. या कोरोना व्हेरिएंटला थोपवण्यासाठी विविध निर्बंध पुन्हा एकदा लागू केले जात आहेत. शिवाय आता पुन्हा एकदा लाॅकडाऊन होणार का?, या भीतीखाली नागरिक जगत आहेत.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोना आटोक्यात, जाणून घ्या आकडेवारी एका क्लिकवर

“शिवसेनेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा”, मनसेची मागणी

“कोलांटीउड्याच्या स्पर्धेत माकडही मागं पडतील, अधिवेशन आलं की यांची तब्येत बिघडते”

दिलासादायक! जगाला टेन्शन देणाऱ्या ओमिक्रॉनवर येणार प्रभावी लस

ट्विटरचा मोठा निर्णय, भारताचे पराग अग्रवाल नवे सीईओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More