बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लाॅकडाऊनमध्ये नवदाम्पत्याची बुलेटवर सफर; पोलिसांनी पकडून केलं असं काही की… पाहा व्हिडीओ 

चंदिगड | भारत सध्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. विविध राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी करुन करत आहेत. हे सर्व सुरु असतानाच एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पोलिसांनी कोरोना नियमांचं पालन करणाऱ्या या जोडप्याला शाबासकी दिली आहे.

व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रस्त्यानं जाणाऱ्या नवविवाहित जोडप्याला पोलिसांनी अडवलं आहे. कोरोना नियमांचं पालन करत दुचाकीवरुन घरी निघालेल्या नवविवाहित जोडप्याला पोलीस शाबासकी देत आहे. कोरोना नियमांचं पालन केल्यामुळं दोघांनीही पोलिसांचं मन जिंकलं आहे. कदाचित याच कारणामुळं पोलिसांनी दोन हार आणून या नव्या जोडप्याचा सत्कार केला आहे. तसच त्यांनी या नव्या जोडप्याला नव्याने संसार सुरु करण्यासाठी आशीर्वाद म्हणून काही रक्कमसुद्धा दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ पंजाब येथील असून त्याला आयपीएस ऑफिसर दिपांशू काबरा यांनी अपलोड केला आहे.

कोरोनाकाळात पोलीस आपलं कर्तव्य चोख पार पाडताना दिसत आहे. ते या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच धडासुद्धा शिकवत आहेत. मात्र, या व्हिडीओमध्ये पोलिसांनी कोरोना नियमांचं पालन करणाऱ्या या जोडप्याचं चांगलं स्वागत केलं आहे. त्यांनी या जोडप्याला मान सन्मान देऊन तसेच त्यांना पैसे देऊन पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिसांच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांना हा व्हिडीओ अतिशय आवडला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याला अनेकांनी पसंत केलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लोकांनी पाहिलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

भाऊ अन् पत्नीच बनले शत्रू; दीर-भावजयीनं मिळून केलेल्या कृत्याने पुणे हादरलं

4 मित्रांनी सरकारी मदतीची वाट न पाहता उभारलं 50 बेड्सचं कोविड सेंटर!

सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा- देवेंद्र फडणवीस

“पवार साहेब, दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले पण…”

हसतं-खेळतं घर कोरोनामुळे उद्ध्वस्त; एकाच दिवशी दोन्ही मुलांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More