बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतासाठी पुढील 2 आठवडे महत्त्वाचे’; तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य

मुंबई | देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमिक्रॉनने (Omicron Varient) चितां वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत वेगाने पसरणाऱ्या या विषाणूने भारतातही प्रवेश केला आहे. नुकतच कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनची दोन प्रकरणं सापडली आहेत. (2 Omicron Patients Found In karnataka) त्यामुळे सध्या देशात सध्या चिंतेच वातावरण आहे. त्यातच आता यासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी पुढील 2 आठवडे देशासाठी अधिक महत्त्वाचे असणार असल्याच सांगितलं आहे.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. नरेश त्रेहन म्हणाले की, ‘आपण खूप कठीण परिस्थितीत आहोत. कारण कोरोनाचा एक नवीन प्रकार सापडला आहे. ज्यामध्ये स्पाईक प्रोटीनवर 30 पेक्षा जास्त प्रकार आहेत. त्याचबरोबर याच्या संपूर्ण संरचनेत 50 पेक्षा जास्त प्रकार आहेत,’ असं सांगून त्यांनी नागरिकांना भीती न बाळगण्याच आवाहन केलं आहे.

ते पुढे म्हणाले, ‘या व्हायरसचे 2 भाग चिंता वाढवणारे आहेत. ते म्हणजे संसर्ग आणि विषाणू. यातील RO घटक 12 ते 18 पट अधिक आहे. जो की अधिक विनाश पसरवू शकतो. मात्र, आता आम्हाला याबद्दल जास्त माहिती नाही. परंतु दक्षिण आफ्रिकेतली परिस्थिती पाहिली तर याचे रुग्ण एका दिवसात दुप्पट होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे,’ असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कर्नाटकातील दोन लोकांना कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली आहे. भारतात ओमिक्रॉनची ही पहिलीच प्रकरणं आहेत. दोन्ही रुग्ण पुरुष असून त्यांचं वय अनुक्रमे 66 वर्षे आणि 46 वर्षे आहे. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु असल्याचंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“अमरावतीत झालेला प्रकार संयोग नव्हे तर प्रयोग होता”

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

Whatsappचा भारतीयांना जोरदार झटका, केली ‘ही’ मोठी कारवाई

चिमुकली हट्टाला पेटली अन् फडणवीस काकांनी पुरवला ‘तो’ बालहट्ट; पाहा व्हिडीओ

“लस प्रमाणपत्रावर स्वतःचा फोटो छापता तर लोकांच्या मृत्यूची जबाबदारी देखील घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More