मुंबई | राष्ट्रीय राजकारणात जाण्याचा माझा कुठलाही विचार नाही. मी दिल्लीला जाणार नाही, मी महाराष्ट्रातचं राहणार आणि पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, असा दृढ आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत एका कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी देखील हजेरी लावली. यावेळी जोरदार राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली.
विरोधकांनी कितीही एकत्र येऊ द्या, पण मला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये पुढची टर्मदेखील मीच मुख्यमंत्री होणार, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मंचावर शिवसेना नेते दिवाकर रावते उपस्थित असताना मुख्यमंत्र्यांनी युतीवर भाष्य करण्याचं टाळलं.
महत्वाच्या बातम्या-
–नगरचे बडतर्फ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी जयंत पाटलांसमोरचं एकमेकांना भिडले!
–गोपीनाथ मुंडेंना त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर भेटलेले अनिल गोटे म्हणतात…
-काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर नारायण राणे म्हणतात…
-…मात्र उद्धव ठाकरेंना पंतप्रधान मोदींना भेटण्यात रस नाही!
–भाजपचे पाच खासदार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संपर्कात?
Comments are closed.