पुढचे पाच दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
पुणे | पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. तर विदर्भातही वाशिम आणि बुलढाण्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस (Pune) सुरु आहे.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने (Weather Department) दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली , बीड, छ. संभाजीनगर , जालना, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांना पुढील पाच तासासाठी इशारा देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसासह, वादळ आणि गारपीटीचाही इशारा देण्यात आलाय.
आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.