बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पुढचा महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या…”

पुणे | राज्यात आगामी काळात महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. राजकीय पक्षांनी या निवडणुकांची आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यातच आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा रविवारी रोजगार मेळावा पुण्यात पार पडला. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.

‘पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार. अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकु. निवडणुकीच्या तयारी लागा’, अशा सुचना सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. पुण्यातील लोक भाजपला कंटाळले आहेत, असं पत्रकार सांगत आहेत. लोकांनी एकदा मतदान केलं. परंतु, महापौरांकडून चांगलं कामं झालं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अजितदादांकडून कामं करून घ्या. निवडणुकीच्या कामाला लागा, येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचाच होईल, प्रचार सुरू करा, असं सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं आहे.

दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला न्याय देण्याचं काम त्या करतील. अजितदादांनी त्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी दिली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. तसेच प्रत्येक महिलेला महिला आयोग आपलं माहेर वाटलं पाहिजे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘ते’ आंदोलन भोवलं; पडळकरांसह 70 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट पण मृतांच्या आकड्यात वाढ, वाचा आकडेवारी

“पिक्चर अभी बाकी है कारण मी अजून पिक्चरमध्ये नाहीये”

‘…त्यासाठी तुम्ही मला खिशात टाकाच’; मलिकाचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

‘…तर जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील’; तालिबानची थेट अमेरिकेला धमकी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More