Top News नाशिक महाराष्ट्र

नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल- संजय राऊत

नाशिक |  सध्याचं राजकीय वातावरण बदललं असून आम्हीसुद्धा नशिकपासून कामाला सुरूवात केली आहे. त्यामुळे कोणी कितीही वल्गना केली तरी नाशिकचा पुढचा महापौर आमचाच असेल, असं शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या अनुषंगाने पाहिलं तर शिवसेना पहिल्या नंबरवर आहे. मात्र सर्वांचा सन्मान राखूनच निवडणुक होतील असं राऊत म्हणाले.

कुणीही कुणाबरोबर गेलं, तरीही मुंबई महापालिका ही शिवसेनेकडेच राहणार आहे आणि नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होईल. असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये पत्रकार परिषद ते बोलत होते.

दरम्यान, भाजपने मनसेसोबत जाण्याची चर्चेबद्दल पत्रकारांनी राऊतांना प्रश्न केला. त्यावर राऊत म्हणाले, ‘हैदराबादमध्ये त्यांना औवेसी मिळाले. मुंबईत कुठल्या पक्षातून ते औवेसी निर्माण करतात हे बघाव लागेल’.

थोडक्यात बातम्या-

“…म्हणून शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं, अशी माझी मनापासून इच्छा”

“रावसाहेब दानवेंची जीभ कापण्याऱ्याला दहा लाखांचं रोख बक्षीस”

“केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही, काम पूर्ण करायला आलोय”

…म्हणून मला आज इथपर्यंत येता आलं- शरद पवार

‘एका दगडात दोन पक्षी मारत’, चंद्रकांत पाटलांनी पवारांना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या