बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील तीन तास मुंबईसाठी धोक्याचे; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

मुंबई | मुंबई आणि उपनगराच्या परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईत जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र गेल्या काही तासांमध्ये ढगांचा गडगडाट आणि पावसाचा जोर वाढलाय.

मुंबईत पावसानं जोर धरला असून पुढील तीन तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई परिसरासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पुढील तीन तास अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 30 ते 40 किलोमीटर वादळी वाऱ्यासह मध्यम ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना झाडाखाली उभे राहू नये. तसेच बाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून ट्विट करुन सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्रात दुपारी भरती येणार आहे. त्यावेळी समुद्रात तब्बल 4.32 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. या काळात पाऊस सुरु राहिल्यास पाण्याचा निचरा होणार नाही. सध्या भरती नसूनही मुंबईतील समुद्र खवळल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी काही तास मुंबईच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत.

दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून मुंबईत जोरदार बॅटिंग करत असलेल्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या चार ते पाच दिवसांत मुंबई आणि कोकण परिसरात आणखी मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

प्रशांत किशोर यांची भाजप विरोधात मोहिम?; प्रशांत किशोर-शरद पवार भेटीवर राष्ट्रवादीचा खुलासा

कोरोनातून देश सावरतोय; देशातील कोरोना रुग्णसंख्येत गेल्या 70 दिवसांतील मोठी घट

‘मुस्लिमांनी लोकसंख्येवर नियंत्रण ठेवावं’; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

‘…तर पुनावालांना सुरक्षा देऊ’; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

शेतात पेरणी करतानाचा एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More