सचिन वाझेंची 200 पानी डायरी NIA च्या हाती; वाझेंची आर्थिक गुपितं होणार उघड?
मुंबई | निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या कार्यालयाची झडती घेताना एनआयएच्या हाती सचिन वाझेंची 200 पानी डायरी लागली आहे. या डायरीत कोणत्या दिवशी कोणाला भेटायचं आहे याचीही तारीख नमूद करण्यात आली आहे.
सचिन वाझे यांच्या डायरीतून अनेक आर्थिक गुपितं उघडकीस येण्याची शक्यता आहे. पब्ज, बार, आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख यात केलेला आहे. मुंबईतील सर्व बार, पब आणि हुक्का पार्लरची यादी यामध्ये आहे. ज्यांनी पैसे दिले त्यांची कोड भाषेत नोंद आहे. कुणाला किती पैसे जात होते, याचा हिशोब सचिन वाझे ठेवत होते. तसेच सचिन वाझे यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमधूनही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. यात पोलीस दलात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचं निष्पन्न झालं आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या डायरीत लाखाच्या नोंदीसाठी L, तर हजाराच्या नोंदीसाठी K हे अक्षर वापरलं आहे. बार, पब, हुक्का पार्लर यांची येणारी रक्कम आणि दिलेली रक्कमही यात नमूद आहे. पैशाचं वाटप नियमित होत होतं. त्याबाबतही कोड भाषेत नोंद आहे. विशेष म्हणजे व्यक्तीऐवजी विभाग यात लिहिण्यात आलं आहे. तसेच ईडी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचं सांगितलं जात आहे. सचिन वाझेंच्या पाच महागड्या गाड्या, साडेपाच लाखांची रोकड, पैसे मोजण्याची मशीन आणि आता हाती लागलेली डायरी ईडीच्या रडारवर आहे. या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणाचा तपास ईडी करणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटकडून 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह यांनी पत्रात केला होता. त्यामुळे आता ईडी स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती आहे.
थोडक्यात बातम्या –
फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा
अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता
‘मला पवारांसारखं इंग्रजी येत नाही’; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला
‘धन्यवाद मोदी सरकार’, राष्ट्रवादीकडून पुण्यात बॅनरबाजी; वाचा काय आहे प्रकरण
नव्या बदलासह नवी ‘Royal Enfield’ लवकरच भारतीय बाजारात धडकणार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.