बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ संशोधनासाठी डेव्हिड ज्युलियस आणि आर्देम पटापाउटियन यांना वैद्यकशास्त्रातील 2021 चा पुरस्कार

नवी दिल्ली | वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीयशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2021 हा अमेरिकेतील डेव्हिड ज्युलियस आणि आर्देम पटापाउटियन यांना जाहीर करण्यात आला आहे. तापमान आणि स्पर्शासाठी रिस्पेटर शोधल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचबरोबर या शास्त्रज्ञांना जवळपास 11 लाख 20 हजार डॉलरचा पुरस्कारप्रत रक्कम म्हणून बक्षीस मिळणार आहे. मागील वर्षी हार्वे अल्टर, मायकल होउगटन आणि चार्ल्स राइस यांना जाहीर करण्यात आला होता.

उष्णता, थंड आणि यांत्रिक शक्ती मज्जातंतूंच्या आवेगांची सुरूवात कशी करू शकते. हे तुमच्या संशोधनामधून समजून आलं आहे. ज्यामुळे आम्हाला आपल्या सभोवतालच्या जगाचे आकलन आणि परिस्थितीशी जुळवून घेता येईल, या संशोधनाचा उपयोग दीर्घकालीन वेदनांसह रोगांच्या विस्तृत श्रेणीसाठी उपचार विकसित करण्यासाठी केला जाईल. असं पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटलं आहे.

स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्युटमधील एका पॅनेलद्वारे वैदकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विज्ञान, साहित्य आणि शांततेतील कामगिरीसाठी , स्वीडिश डायनामाइट शोधक आणि व्यापारी अल्फ्रेड नोबेल यांच्याकडून बक्षिस देण्यात येत आहे. अर्थशास्त्राचे पारितोषिक प्रथम 1969 साली देण्यात आला होता.

दरम्यान,  येत्या आठवड्यात  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील पुरस्कार जाहीर होणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

#लखीमपूर | “कोणा व्यक्तीचा जीव जात असेल, तर त्यास जबाबदार कोण?”

शाहरूखच्या लेकाच्या अडचणीत वाढ???; आर्यन खानला होऊ शकते 10 वर्षाची शिक्षा!

‘आमच्या शेतकऱ्यांचा…’; लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेवर शरद पवार संतापले!

हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करताना दिसल्या प्रियांका गांधी, पाहा व्हिडीओ

‘जर पोलिसांनी प्रियांका गांधींना सोडलं नाही तर…’; नाना पटोले आक्रमक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More