…म्हणून मुंबई-पुणे महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा, धक्कादायक माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुबंई | वाढत्या सुखसोयी, वाढत्या गाड्यांचं प्रमाण आणि त्यासोबत वाढते अपघात (Accident) हे आता एक समीकरण झालं आहे. त्यामध्ये हल्ली माहामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढताना दिसत आहे. यातीलच एक महामार्ग म्हणजे पुणे-मुंबई महामार्ग होय (Pune-Mumbai Highway). पुणे-मुंबई महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नुकतंच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा अपघात देखील याच महामार्गावर झाला होता. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गवर अपघातांची मालिका सुरुच आहे. यावर्षी पुणे-मुंबई महामार्गवर झालेल्या अपघाताचं प्रमाण थक्क करणारं आहे.

गेल्या नऊ महिन्यांची ही आकडेवारी आहे. जानेवारी 2022 ते सप्टेंबर 2022 पर्यंतच्या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. या दरम्यान एकूण 145 अपघातांची नोंद झाली आहे. त्यातील 44 अपघात हे गंभीर (severe) स्वरुपाचे होते. या अपघातांमध्ये जीव गमावलेल्यांची संख्या 47 इतकी आहे.

यासगळ्यांमुळे पुणे-मुंबई महामार्गवर मृत्यूचा सापळा बनलाय की काय असं म्हटलं जात आहे. यापूर्वी देखील अनेक प्रसिद्ध लोकांचे अपघात या महामार्गावर झाले आहेत. भक्ती बर्वे (Bhakti Barve), आनंद अभ्यकर, आनंद पेंडसे अशी काही नावं सांगता येतील.

या अपघातांची अनेक कारणं समोर आली आहेत. यातील महत्वाचं कारण म्हणजे चालकांचा बेशिस्तपणा असल्याचं सांगितलं जात आहे. लेन कटिंग केल्याने आणि लेनची शिस्त न पाळल्याने असे अपघात होत आहेत. तसेच पुणे-मुंबई या महामार्गावर असलेला उतार, टोकदार वळणे आणि यंत्रणेचा निष्काळजीपणा(Carelessness) ही कारण असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

पुणे-मुंबई या महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहतूकीचे नियम न पाळल्यास मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला. त्यामुळे वाहनचालकांवर थोडी वचक बसली होती. मात्र आता कारवाई (action) थंडावल्याने सर्रास मनमर्जी केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या