बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात दररोज 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालं असून आज राज्यात फक्त 26,616 रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणांचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

राज्यात आज 516 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.53 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 26,616 नवीन रुग्ण सापडल्यानंतर राज्यात आज रोजी एकूण 4,45,495 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 54,05,068 झालीये.

राज्यात आज 48,211 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 48,74,582 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19% एवढं झालं आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,13,38,407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,05,068 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 33,74,258 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत आज पुन्हा घट झाली आहे. मुंबईत आज 1240 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2587 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आज 48 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 34 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

थोडक्यात बातम्या- 

दहावीचा निकाल कसा जाहीर करणार?; महत्वाची माहिती आली समोर

‘बॉलिवूडमधील मित्रांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला’; प्रसिद्ध मराठी अभिनेता श्रेयस तळपदेचा खुलासा

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ऑन फिल्ड; गेट वे ऑफ इंडिया परिसरात जाऊन केली पाहणी

माझा प्रणीतदादा गेला… मित्राच्या मृत्यूनं प्रविण विठ्ठल तरडे हळहळले!

“एकाचं लक्ष मुंबईवर अन् दुसऱ्याचं बारामतीवर, उर्वरीत महाराष्ट्र वाऱ्यावर”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More