बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णसंख्येत आता हळूहळू घट होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात दररोज 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. राज्यात आज 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झालं आहे.

आजपर्यंत एकूण 4978937 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91.06% एवढे झालं आहे. राज्यात आज 594 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

सध्या राज्यातील मृत्यूदर 1.54% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 31874364 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 5467537 नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3059095 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 23828 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण 401695 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. मुंबईत आज 1350 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4,565 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत 29 हजार 643 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोना लसीमुळे माझा 10 वर्षांपासूनचा आजार नाहीसा झाला’; शिक्षकाचा दावा

चक्रीवादळामुळं उन्मळून पडलेल्या झाडासमोर अभिनेत्रीचा डान्स; नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं

कोरोनाबद्दल खळबळजनक ट्विट करणाऱ्या डॅाक्टरचा कोरोनानेच घेतला जीव

दिलासादायक! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

केंद्राकडून गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज; वादळातील बळींच्या कुटुंबीयांना 2 लाख रूपयांची मदत जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More