बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची कालची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये काल 24 तासात एकूण 2 हजार 662 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 5 हजार 746 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात दिलासादायक असल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 54 हजार 143 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 89 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 5 लाख 89 हजार 619 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील आजची रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या –

फक्त 12 रुपयांत 2 लाखांचा विमा; मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत सहभागी झालात का?

…अन् चक्क स्मशानभूमी बाहेर हाऊसफुल्लचा फलक; कोरोनामुळे विदारक परिस्थिती

दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू, वृद्ध आई-बापाचा टाहो ऐकून सारं गाव सुन्न

“…अन्यथा भाजप महाराष्ट्रात दुर्बिण घेऊन शोधला असता तरी सापडला नसता”

देव माणूस!! नो लिमिट’ योजनेअंतर्गत टाटांची 2000 कोटींची गुंतवणूक

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More