बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची गेल्या 24 तासातील आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 3 हजार 672 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 5 हजार 542 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी ही काहीशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 57 हजार 342 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 89 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आजपर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 5 लाख 83 हजार 873 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढत होती. पण मुंबईतील आजची रुग्णसंख्या ही मागच्या 2 ते 3 दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या असल्याचं दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या – 

#सकारात्मक_बातमी 20 टक्के फुफ्फुस काम करत असताना देखिल महिलेची कोरोनावर मात

पुण्यात कोरोनाचं थैमान थांबेना; गेल्या 24 तासातील मृतांची आकडेवारी चिंताजनक

दिल्ली कॅपिटल्सचा पंजाब किंग्सवर विजय, धवनची जबरदस्त अर्धशतकी खेळी

धक्कादायक! हळदीच्या आदल्या दिवशीच धारदार हत्याराने युवकाचा खून

बकरी, गाय, झोपडी ही संपत्ती, रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी झाली आमदार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More