बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोका वाढतोय! मुंबईत आजही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाजा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

मुंबईत आज दिवसभरात 397 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 507 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 7 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,42,401 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 2736 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 15963 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,21,257 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. मात्र आता संख्येमध्ये चढ-उतार होताना दिसत आहेत. त्यामुळे नागिरकांना दक्षता घ्यायली हवी.

थोडक्यात बातम्या- 

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, वाचा आजची आकडेवारी

‘भारताने पाकिस्तानसोबत….’; तालिबान्यांचा काश्मीरबाबत भारताला ‘हा’ सल्ला

काबूल विमानतळावरील पाणी बॉटल आणि जेवणाची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

“नारायण राणे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येऊ शकतात”

बुधवारी झालेल्या लक्षणीय रूग्णवाढीनंतर पुण्यातील आजची आकडेवारी पाहा एका क्लिकवर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More