बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात कोरोना रुग्णसंख्येत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ, धडकी भरवणारी आकडेवारी आली समोर

नवी दिल्ली | कोरोनाचं सावट काही संपायचं नाव घेईना. यातच नवीन व्हेरियंटनं तर आणखीनंच थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ पहायला मिळत आहे. ओमिक्राॅनच्या धास्तीनं अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांनी निर्बंधांचे सक्तीनं पालन करावे असं वारंवार सांगण्यात येत आहे. सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे.

वाढत्या रुग्णसंख्येनं चिंतेत भर पाडली आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 55.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशभरात गेल्या 24 तासांत नोंद झालेल्या रुग्णांची संख्या 58,097 इतकी आहे.

देशभरातील एकूण बाधितांची संख्या आता 35,018,358 इतकी झाली आहे. देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 2,14,004 इतकी आहे. ही रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर तिसरी लाट येेऊ शकते.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंट धोकादायक असून त्यांच्यामुळे रुग्णसंख्या नवे रेकॉर्ड नोंदवत असून रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृत्यूंचं प्रमाणही वाढत आहे.

थोडक्यात बातम्या – 

Corona: उद्यापासून पुणे शहरात ‘या’ निर्बंधांचं करावं लागणार पालन

धक्कादायक! पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

मोठी बातमी! पुण्यातील 1 ली ते 8 वीच्या शाळा बंद

धक्कादायक! राज्यात तब्बल दोन डझन नेत्यांना कोरोनाची लागण, ‘या’ नेत्यांचा समावेश

“आपको हमारे जैसे हजारो मिलेंगे, पर…”; स्टोरी ठेवत तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More