बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! रत्नागिरीत जून महिन्यात तब्बल ‘इतकी’ मुलं कोरोनाच्या विळख्यात

रत्नागिरी | रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना विळखा घातल्याचे पाहायला येत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुले कोरोनाच्या विळख्यात सापडलेली पाहायला मिळत आहे.

जून महिन्यात तब्बल 1176 बालके कोरोनाबाधित सापडली आहेत. रत्नागिरीत कोरोनाचा विळखा बसलेली बालके 14 वर्षाच्या आधी वयोगटाची आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात बालके बाधित होण्याचं प्रमाण 6.44 टक्के एवढं आहे.

रत्नागिरीत दर दिवशी 400 ते 500 कोरोना रुग्ण आढळत आहे. सद्यस्थितीत 6102 ॲक्टिव्ह रुग्ण असून पॉझिटिव्हीटी रेट हा 7.87 टक्के आहे. तर मृत्यूदर हा 2.86 टक्के असून रिकव्हरी रेट हा 87.97 टक्के आहे.

दरम्यान, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाचा विळखा बसू लागला आहे.

थोडक्यात बातम्या- 

ह्रदयद्रावक! 12 दिवसाच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू

‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ…’; राऊतांचं सूचक ट्विट

इन्स्टा रिच लिस्टमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राचं नाव!

नवरदेवासाठी त्याचे मित्रच ठरले लग्नातील विघ्न; रिकाम्या हाती परतला नवरदेव

अबब..! विराट कोहलीच्या एका इन्स्टाग्राम पोस्टला मिळते एवढी मोठी रक्कम

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More