बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे.  प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.

दिवसभर लाॅक़डाऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर  पडत नाहीत परिणामी रुग्णसंख्येत घट झाल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल  48,401 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला  मिळालं, काल 572 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना काल हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबईतुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रात सध्या 6 लाख 15 हजार 783 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. आता तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का? की, नेहमीसारखं बेजबाबदार वागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच्या लाॅकडाऊनमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या 75 हजार 849 झाली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे.  काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 2 हजार 025 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा असा सकारात्मक परिणाम होणार की  रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोना रूग्णांसाठी ‘हे’ प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात

अंगावर काटा आणणारा अपघात! गाडीची धडक झाल्यावर तरूण उडाला हवेत…, पाहा व्हिडीओ

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हा दाखल

कोरोनामुळं अभिनेत्याचा मृत्यू, मृत्यूपूर्वी लिहिलेली धक्कादायक पोस्ट व्हायरल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More