बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सलग सातव्या दिवशी देशातील बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; कोरोनामुक्त होणाऱ्यांची टक्केवारी वाढली

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं होतं. पण आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर येत आहे.

भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असताना पाहायला मिळत आहे, तसेच बरे होणाऱ्यांचं प्रमाण नव्या बाधितांपेक्षा सलग सातव्या दिवशी अधिक आहे. देशात गेल्या 24 तासात 2 लाख 76 हजार 070 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळालं, 24 तासात एकुण 3 हजार 874 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मागच्या 24 तासात देशात 3,69,077 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 31 लाख 29 हजार 878 सक्रिय रूग्णसंख्या आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे भारतातील कोरोना रूग्णांची बरे होण्याची टक्केवारी ही 86.74% एवढी आहे.

भारतात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा आधीच पार केला आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात लाॅकडाऊन 1 जुन पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणुन वापरण्यात यावा, असा सल्ला राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्येही लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहच्या आईचं कोरोनाने निधन

15 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला नकाशाची काय गरज?, मोदींवर टीका; राष्ट्रवादीनं दाखवला पवारांचा व्हिडीओ

‘…तेव्हा साहेबांच्या खिशातल्या पेनाची शाई संपली होती का?’; राम सातपुतेंची रोहित पवारांवर टीका

दोन कोटी लसी जमिनीतून उगवल्या का?- देवेंद्र फडणवीस

सकाळी वडील आणि दुपारी मुलीचा कोरोनाने केला घात; नेमबाज मोनाली गोऱ्हे अनंतात विलीन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More