एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये भारतीयांचा आकडा थक्क करणारा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | विवाहानंतर पुरुष किंवा स्त्री जोडीदाराशिवाय इतर कोणावर प्रेम करणं, भावनिक किंवा मानसिक संबंध ठेवणं ज्याला आपण विवाहबाह्य संबंध अर्थात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Extramarital affair) म्हणतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण यासाठी काही मोबाईल अ‌ॅपदेखील यासाठी तयार करण्यात आले आहेत.

असं आम्ही नाही एक्स्ट्रा मॅरिटियेल अफेअरसाठी बनवण्यात आलेल्या एका कंपनीनं सांगितलं आहे. हे अॅप तुम्हाला एक्स्ट्रा मॅरिटियेल अफेअर करायचं असल्यास डेटिंगसाठी लोक शोधून देतात. ग्लीडेन (Glidden) एक्स्ट्रा मॅरिटियेल डेटिंग अॅप फ्रेंच (French) कंपनीनं बनवलं आहे. कंपनीचं नाव देखील ग्लीडेन आहे.

कंपनीच्या माहितीनुसार 2022 पासून हे अ‌ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची सख्या प्रचंड वाढली आहे. वापरकर्त्यांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील 20 टक्के लोक भारतातील आहेत. अॅपच्या डेटानुसार 20 भारतीय लोकापैकी 40 टक्के स्त्रीया असून त्या हाऊस वाईफ (Housewife) आहेत.

वयाचं सांगायचं तर हे अॅप वापरणाऱ्या महिलांचं सरासरी वय 26 तर पुरुषांचं 30 आहे. या अ‌‌ॅपमध्ये महिलांसाठी अनेक सेफ्टी फिचर्स असल्यामुळं महिला बिनधास्त हे अ‌ॅप वापरत आहेत. भारतात पहायला गेल्यास भारतातील बंगळुरु (Bangalore) हे शहर एक्स्ट्रा मॅरिटियेल अफेअरसाठी आघाडीवर आहे.

बंगळुरु शिवाय दिल्ली, मुंबई(Mumbai), कोलकत्ता, नागपूर, चेन्नई, सूरत, गुरुग्राम, अहमदाबाद(Ahmedabad), चंदीगढ, कोची यासारंख्या अनेक शहरांचाय समावेश आहे. यासगळ्या अहवालामुळे भारतात देखील याचं प्रमाण वाढलं असल्याचं समजल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच अनेक डेटिंग अ‌ॅप असल्यातरीदेखील विवाहित लोकांसाठी हे अ‌ॅप महत्त्वाचं ठरत असल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या