बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली होती. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत आता वाढ होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात 03 हजार 783 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 04 हजार 364 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

राज्यात दिवसभरात 52 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्यात आजपर्यंत 65 लाख 07 हजार 037 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणात न्यायालयाने दिला ‘हा’ मोठा निकाल

‘आता तरी सरकारनं जागं व्हावं’; खासदार संभाजी राजेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

कोरोना अपडेट! मुंबईची आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

…अन् त्या दिवशी माझा क्रिकेटमधील इंटरेस्टच संपला; आव्हाडांनी घेतली गावस्करांची फिरकी

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More