बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांच्या घरात; पाहा दिलासादायक आकडेवारी

मुंबई | गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रभर हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण आला आणि परिणामी अनेकांना उपचाराअभावी आपला प्राण गमवावा लागला. परंतु, आता महाराष्ट्रातील रुग्ण संख्या ही हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.

आज महाराष्ट्रात 10 हजार 442 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच आज 07 हजार 504 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. 24 तासात महाराष्ट्रात 483 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 59 लाख 08 हजार 992 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 56 लाख 39 हजार 271 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 1 लाख 11 हजार 104 जणांनी आपला प्राण गमावला आहे. सध्या महाराष्ट्रात 1 लाख 55 हजार 588 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही महिन्यात वाढणारी रुग्णसंख्या ही कमी झाल्याने महाराष्ट्रात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अनलॉकला देखील सुरुवात झाली आहे. अशीच रुग्णसंख्या कमी होत राहिली तर महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल.

थोडक्यात बातम्या –

जबरदस्त! अखेर सांगलीच्या ‘या’ कंपनीला मिळाली कोरोना इंजेक्शनच्या मानवी चाचणीची परवानगी

‘…म्हणून महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल आहे ‘; पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा खुलासा

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 03 कोरोनाबाधितांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास ‘ही’ बँक वार्षिक उत्पन्नाच्या चार पट पैसे व 2 वर्ष पगार कुटुंबाला देणार

‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More