रुग्णसंख्या वाढली, कोरोना बळीही वाढले, कोरोनाचा कहर; ‘या’ देशात संपूर्ण लाॅकडाऊन घोषित
ढाका | बांग्लादेश मध्ये कोरोनाचा प्रचंड कहर चालू आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून बांग्लादेशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे देशात आठवडाभरासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बांग्लादेशचे परिवहन मंत्री ओबेदुल कादीर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
ओबेदुल कादीर यांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन बांग्लादेशमध्ये 8 दिवसाचा लॉकाडऊन करण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. 5 एप्रिलपासून सात दिवस हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व कार्यालये आणि कोर्ट बंद राहणार आहेत. परंतु, उद्योग आणि मिल्स रोटेशनपद्धतीने सुरू राहतील. मिल बंद केल्यास कामगार त्यांच्या घरी परततील म्हणून मिल्स सुरू ठेवण्यात येणार, असं कादीर यांनी सांगितलं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण देशात लॉकडाऊन करणारा बांग्लादेश हा आशिया खंडातील पहिला देश ठरला आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयाने कोरोना रोखण्यासाठी 18 मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यात गर्दी टाळण्यावर अधिक भर देण्यात आला होता. तसेच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना मनाई घालण्यात आल्या आहेत. तसेच अशा कार्यक्रमांपासून लोकांनी दूर राहण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं.
दरम्यान, बुधवारी 24 तासांत बांग्लादेशात कोरोनांची रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. बुधवारी सापडलेल्या रुग्णसंख्येने बांग्लादेशातील आजवरचे सर्व विक्रम मोडले आहेत. बांग्लादेशात एप्रिलमध्ये 6469 रुग्ण सापडले होते. तर एकट्या बुधवारी अवघ्या 24 तासात देशात 5358 रुग्ण सापडले आहेत.
थोडक्यात बातम्या –
“…तर 30 एप्रिलपर्यंत कोरोनाची साखळी तोडणं शक्य आहे”
“माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत”
सचिन वाझे यांच्या प्रकृतीला धोका, वैद्यकीय तपासणीत ‘ही’ धक्कादायक बाब उघड
भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!
‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.