बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुग्णसंख्या हजारात पण शिल्लक बेड बोटावर मोजण्याएवढेच; ‘या’ शहरातील विदारक परिस्थिती

पुणे | पुण्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला असून रुग्णसंख्येच्या वाढीमुळे पुण्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचं दिसून येत आहे. पुण्यात सध्या 52 हजारांच्या आसपास सक्रिय रुग्णसंख्या असून आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुण्यामध्ये एकूण सक्रिय रुग्णसंख्या 52 हजार 476 असून ऑक्सीजन बेडची उपलब्धता ही 45 एवढी आहे. त्याबरोबरच पुण्यात एकही व्हेंटिलेटर बेड किंवा आयसीयू बेड रुग्णासाठी उपलब्ध नसल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे. त्यामुळे सध्या पुण्याच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यातील ही भीषण परिस्थिती पाहून आरोग्य यंत्रणेची निव्वळ लक्तरं निघाल्याचं भयान चित्र समोर येत आहे. पुण्यातील परिस्थितीमुळे कोरोना रुग्णांना उपचाराअभावी मरण पत्करावं लागत असल्याचं भयावह चित्र समोर आल्यानंतर आतातरी रुग्णांसाठी युद्धपातळीवर सोयीसुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न होणार का? असा प्रश्न जनमानसातून विचारला जात आहे.

शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने नुकताच इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला. पण पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान 5 दिवस लागतील, असं अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त बी एस प्रतापवार यांनी सांगितलं आहे. तसेच इंजेक्शनचे एक बॅच तयार करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

थोडक्यात बातम्या

गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्य सरकारने जाहीर केली नवी नियमावली, वाचा सविस्तर

परीक्षा आताच घ्या अन्यथा… ; दहावी-बारावीचे विद्यार्थी आक्रमक

खासगी गुप्तहेराद्वारे दगा देणाऱ्या पतीला तिनं रंगेहाथ पकडलं

गतवर्षीचा वचपा काढण्यासाठी राहुलची ‘पंजाब किंग्ज’ तयार

गुजरातमधुन महाराष्ट्राला मिळणार रेमडेसिवीरचे 50 हजार डोस; भाजपची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More