‘या’ कारणामुळं वाढतंय सायलेंट Heart attack चं प्रमाण!

नवी दिल्ली | हल्लीच्या वाढत्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळं आरोग्याची काळजी घेणं गरजेचं बनत चाललं आहे. अशातच अचानक हाॅर्ट अ‌ॅटक (Heart attack) येण्याची लक्षणं देखील वाढली आहेत. येणारे हार्ट अ‌ॅटक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

सायलेंट हार्टअ‌ॅटक हा त्यामधील सगळयात खतरनाक समजला जातो. यामुळं अनेकदा त्याची काही लक्षणं दिसून येत नाहीत. माणूस अचानक मरण पावतो. अनेकदा यामुळे वैज्ञानिक देखील आश्चर्य व्यक्त करताना दिसून येतात. अशा लोकांना डायबेटीज (Diabetes) किंवा शुगरचा देखील त्रास नसतो.

दिल्लीतील एका 42 वर्षीय व्यक्तीला गाडी चालवत असताना अचानक अ‌ॅटक आला. त्यानंतर त्याला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यावेळीच त्याच्यावर अॅजिओग्राफी (Agiography) करण्यात आली. अॅजिओग्राफीमध्ये त्यांच्या 90 ते 100 धमन्या ब्लाॅक झाल्याचं दिसून आलं. त्या रुग्णावर तुरंत अ‌ॅजिओप्लास्टी करण्यात आली. त्याचा जीव थोडक्यात वाचला.

डाॅक्टरांच्या मते त्या रुग्णाला सायलेंट हार्ट अॅटक आला होता. सायलेंट हार्ट अॅटकमध्ये धमन्यांमध्ये 30 ते 40 टक्के ब्लाॅकेज असू शकतं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तणाव आहे. तणावामुळं रक्तात गुठळ्या तयार होतात. काहीवेळा या गुठळ्या मोठ्या देखील असू शकतात. ज्यामुळं रक्तवाहिन्या खंडित होऊ शकतात.

सायलेंट हार्ट अॅटकपासून वाचण्यासाठी वारंवार ह्रद्याची तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. डायबेटीज, शुगर या गोष्टींची काळजी घेत राहण्यचा सल्ला डाॅक्टारांनी दिला आहे. तुम्हाला पित्तामुळं छातीत दुखण्याचा त्रास असेल तर डाॅक्टारांशी नक्की संवाद साधा.

महत्त्वाच्या बातम्या