बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लायकी काढत चक्क नर्सने लगावली डाॅक्टरांच्या कानशिलात, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली | कोरोना काळात अनेक रुग्णालयात डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अनेक नातेवाईक आणि डाॅक्टरांची भांडणं तसेच मारहाण देखील झाल्याचं समोर आलं आहे. मात्र सोशल मीडियीवर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका नर्सने डाॅक्टरांच्या कानाखाली लगावली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.

संबंधित रुग्णालयात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी मृत्यूच्या दाखल्याची मागणी केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. नातेवाईकांच्या मागणीनंतर मृत्यूचा दाखला आणण्यासाठी नर्स डॉक्टरांकडे गेली होती. मात्र डॉक्टरांनी तिला लेखी मागणी करण्यास सांगितलं. यादरम्यान नातेवाईकांना पुन्हा मृत्यूच्या दाखल्याची मागणी केली. अशातच कामाच्या प्रचंड ताणामुळे डॉक्टर आणि नर्समध्येच वादाची ठिगणी पडली.

सुरुवातीला त्या दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर संतापलेल्या नर्सनं थेट डॉक्टरांच्या कानशिलात लगावली. यामुळे डॉक्टरनेदेखील नर्सवर हात उचलला. यामुळे रुग्णालयात एकच चर्चा सुरु झाली. यादरम्यान, पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्यांची समजूत काढून तात्पुरतं भांडण मिटवलं. या संपुर्ण भांडणादरम्यान एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

दरम्यान, मारहाण करण्यापुर्वी संबंधित नर्सने तुझी औकात आहे का?, असा सवाल डाॅक्टरांना केला होता. तसेच या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढली आहे. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

थोडक्यात बातम्या-

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने कमी व्हायला सुरूवात; बरे होणाऱ्यांचं प्रमाण अधिक

…तर मिळणार नाही गॅस सिलेंडर, जाणून घ्या LPG कंपनीनं आणलेला नवा नियम

“जड्डुला प्रसिद्धी नको आहे, तो शांतपणे सर्वांना मदत करतो”

…अन्यथा कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांवरच दाखल होणार गुन्हे, ‘या’ शहरात नवा नियम

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! लग्नाआधी नवरदेव कोरोना पाॅझिटिव्ह; चक्क पीपीई घालून उरकलं लग्न

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More