बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

ठाणे | राज्यभर वेगाने कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु असताना ठाणे जिल्ह्यातील कळव्यामधील आतकोनेश्वर भागात लसीकरणादरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्यक्तीला कोरोनाऐवजी रेबिजची लस दिली गेली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर संबंधित डॉक्टर आणि नर्सवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मंगळवारी दुपारी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर त्यांंनी तातडीने या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महापौरांच्या आदेशानुसार डॉक्टर राखी तावडे आणि नर्स किर्ती पोपरे यांना निलंबित करण्यात आलं आहे.

ठाणे महापालिका गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या हद्दीतील एका लसीकरण केंद्रावर एका महिलेला एकाचवेळी लसीचे तिन्ही डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर आता कोरोनाऐवजी रेबिजची लस दिल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

दरम्यान,  वारंवार घडणाऱ्या अशाप्रकारच्या घटनांमुळे महापालिकेची नाहक बदनामी होत असल्यानं महापौरांनी तातडीने बैठक बोलावत कारवाईचे आदेश दिले. ज्या व्यक्तीला रेबिजची लस देण्यात आली होती. त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

थोडक्यात बातम्या –

आमदार सुहास कांदेंना धमकीचा फोन, छगन भुजबळांनी उचललं हे मोठं पाऊल!

अरे मारतो का आता! अन् थोडक्यात बचावला दिनेश कार्तिक, पाहा व्हिडीओ

“मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करा”

वाहह! आता सुईशिवाय दिली जाणार लस, कसं ते जाणून घ्या

“गोव्याचे राजकीय डबके करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More