बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी नर्सची भन्नाट आयडिया, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये कडक लॉकडाऊनदेखील करण्यात आला होता. तुम्हाला एकदा जर का कोरोना झाला तर तुम्हाला विलगीकरणात राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे रुग्णांमध्ये एकटेपणा आल्याचं दिसून आलं.

ब्राझीलमध्ये एका नर्सने कोरोनाबाधित रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. या नर्सने रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी हातात घालण्यात येणाऱ्या हात मोज्यामध्ये पाणी भरून रुग्णाच्या हाताच्या दोन्ही बाजूला तो ठेवून तो त्याचा हाताला बांधून टाकला.

नर्सने लढवलेल्या आयडियाला एका व्यक्तीने ट्विटरवर शेअर करत तिने केलेल्या जुगाडाचा फोटो देखील ट्विट करून तो हात देवाचा असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच ही घटना ब्राझील येथील कोरोना वार्डातील असल्याचं त्या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आर्टिफिशियल ह्यूमन टच म्हणजेच मानवी स्पर्श देण्याचा या नर्सने जो प्रयत्न केला आहे. त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात असून या फोटोला बघुन अनेकांना आपल्या भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनासारख्या रोगामध्ये कोणाच्या संपर्कात येता न आल्याने किंवा आपल्या परीजनांच्या सोबत राहता न येण्यामुळे बरेचसे रुग्ण एकटेपणात जीव सोडत असताना पाहायला मिळत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नर्सने केलेल्या या जुगाडाचं सर्वांनी कौतुक केलं आहे.

थोडक्यात बातम्या

लस घेतल्यानंतरही पुन्हा होतोय कोरोना?; सीरमच्या अदर पुनावालांनी सांगितलं खरं कारण

पुण्यात वीकेंड लाॅकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद?

‘लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल पण…’; प्रविण दरेकरांचं मोठं वक्तव्य

कोरोना रुग्णाला घेऊन जाताना तो ऊसाचा रस प्यायला थांबला, पाहा धक्कादायक व्हिडीओ

धमाकेदार ऑफर! ‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More