बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ओबीसी आरक्षण ‘त्या’ विचारांना मान्य नाही, विरोधात कोण हे आता समजलं असेल”

धुळे | आरक्षणच्या मुद्यावरून राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत कलगीतूरा रंगलेला असतो. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं ओबीसींच आरक्षण गेल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केंद्र सरकारवर ओबीसी आरक्षणाचं खापर फोडलं आहे. आता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

भाजपचं केंद्रात सरकार आहे, केंद्र सरकार ओबीसी आरक्षणासाठी महत्वाचा असणारा इम्पिरिकल डाटा राज्याला देत नाही. त्या विचारांना ओबीसी आरक्षण मान्य नाही, अशी टीका मुंडे यांनी केली आहे. त्यावेळी राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार होतं, पण या दोन्ही सरकारनी ओबीसींच्या आरक्षणासाठी महत्वाचा इम्पिरिकल डाटा उपलब्ध केला नाही, म्हणून आरक्षण गेलं. यावरून राज्यातील जनतेला आरक्षण विरोधात कोण हे समजलंच असेल, अशी टीका मुंडे यांनी केली आहे.

समग्र ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार गंभीर आहे. ओबीसी समाजाच्या न्यायासाठी आम्ही काम करत आहोत, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि तत्कालिन भाजप सरकारवर मुंडे यांनी जोरदार टीका करताना ओबीसींच्या आरक्षणाला भाजपच्या विचारांचा विरोध असल्याचं म्हणालं आहेत.

दरम्यान, धनंजय मुंडे हे धुळे येथे धनगर समाजाच्या मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी धनगर आणि धनगड या शब्दांच्या गुंतीवर राज्य सरकार लवकरच तोेडगा काढणार असल्याचं वक्तव्य केलं आहे.

थोडक्यात बातम्या 

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रावण गँगमधील 4 जणांना केली अटक

“महिना 100 कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते?”

“फडणवीस सत्तेत असताना शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं होतं”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More