बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वृद्धाची हत्या करुन गावाबाहेर नेऊन पुरलं, मात्र कुत्र्यांनी…

हिंगोली | हिंगोलीमधील सेनगाव तालुक्यात असलेल्या साखरा याठिकाणी अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 85 वर्षांच्या वृद्ध महिलेला एका अज्ञात व्यक्तीने गावापासुन लांब नेऊन पुरलं. मात्र त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला तो म्हणजे त्या गावातील कुत्र्यांमुळे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

85 वर्षांची असलेल्या मृत महिलेचं नाव भारजाबाई मारोती इंगळे असं आहे. ही महिला साखरा या गावातील रहिवासी असून या महिलेला तीन मुलं आहेत. ही मुलं देखील त्याच गावात राहायला असून तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. शनिवारी ही महिला घरी एकटी असताना पहाटे एका अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या घरात घुसून महिलेची हत्त्या केली. महिलेचं तोंड दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे.

भारजाबाई यांचा मृतदेह गावापासून बाहेर जवळपास तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या साखर तांडा घाटात एका खड्ड्यात टाकून पुरण्यात आला. या घटनेनंतर या परिसरातील कुत्र्यांना चाहूल लागल्याने कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केली होती. सर्वच कुत्री एकाच बाजूला भुंकत असल्याचं पाहून या भागातील शेतकऱ्यांना संशय आला. त्यानंतर कुत्री भुंकत आसलेल्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांनी पाहणी केली. या ठिकाणी पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना एक खड्डा बुजवल्याचे दिसून आले. म्हणून शेतकऱ्यांनी गावातील लोकांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांना सांगण्यात आलं.

दरम्यान, पोलिसांचं पथक त्या ठिकाणी दाखल झालं आणि त्यांनी खड्डा उकरून पाहिल्यानंतर त्यांना मृतदेह दिसला. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या हत्त्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसेच गावातील सीसीटिव्ही असलेल्या दुकानांचं फुटेज तपासून गावात कोणत्या गाड्या आल्या किंवा गेल्या याचाही तपास पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“अडवानी गांधीनगरचे खासदार होते म्हणून भाजपने 6 वेळा माझं तिकीट कापलं”

मुख्यमंत्र्यांचं ठरलं; महाराष्ट्रात 8 दिवसांचा कडक लाॅकडाऊन?

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याचा दावा, खरं कारण समोर आल्यावर पोलिसही हादरले

आयटी कंपनीतील तरुणीला गुंगीचं औषध देऊन कॅब चालकाने केला ‘हा’ प्रकार; पुण्याला हादरवणारी घटना

“फक्त एक राजाच चांगलं शासन करू शकतो, चंगू मंगु नाही”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More