बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron डेल्टापेक्षा पाचपट घातक; केंद्र सरकारने दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

नवी दिल्ली | कर्नाटक (Karnataka) राज्यात आज ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) दोन रूग्ण सापडले आहेत. भारतात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन विषाणू सापडल्यामुळे केंद्र सरकार (Central Government) सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. (Love Agarwal Joint Secretary Union Ministry of Health)

ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएटंपेक्षा पाचपट अधिक बलशाली म्हणजेच संसर्गजन्य आहे. त्यामुळे संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असणार आहे. ओमिक्रॉन विषाणूची धास्ती घेत जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. भारताकडून काही देशांना हाय रिस्क यादीत टाकण्यात आलं आहे. तसेच देशात ओमिक्रॉन रूग्ण आढळल्यामुळे घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही. सतर्क राहावं लागेल आणि कोरोनाविषयक नियमांच पालन करावं लागेल, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितलं आहे.

जागतिक आरोग्य संंघटनेने (WHO) देखील कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं आहे. त्यातच आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचा कर्नाटकात शिरकाव झाल्याने देशाची चिंता वाढली आहे. पत्रकार परिषदेत लव अग्रवाल यांनी कोरोना स्थितीबाबत माहिती दिली. महाराष्ट्र आणि केरळ (Maharashtra and Kerala) राज्यात दहा हजारांपेक्षा अधिक रूग्ण आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये देशातील रूग्णसंख्येपैकी 55 टक्के रूग्ण असल्याचं लव अग्रवाल यांनी सांगितलं आहे. तसेच कर्नाटकमध्ये सापडलेल्या दोन रूग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे आढळलेली नाहीत. जीनोम सिक्वेंसिंगनंतर (Genome sequencing) दोन जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच देशभरात 49 टक्के नागरिकांना लसीचे  दोन डोस (Vaccination) देण्यात आल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब”

Omicron Variant चा लहान मुलांना धोका?; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला

“R.R.Patil यांनी चोख काम केलं होतं, आता अभद्र युती तोडण्याची गरज”

च्युइंगम खाल्ल्याने कोरोना रोखता येतो?, शास्त्रज्ञांनी केला ‘हा’ दावा

मिर्झापूर वेब सीरिजमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू, बॅालिवूडमध्ये खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More