बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ज्याच्यासाठी पैसा जमवला तोच राहिला नाही; आई बापानं उचललं अभिमानास्पद पाऊल

गांधीनगर | कोरोना महामारीमुळे अनेकांनी आपल्या जीवलगांना म्हणजेच, मित्र, मुलगा आणि नातेवाईकांना गमावलं आहे. अशातच गुजरातच्या अहमदाबादमधील एका दाम्पत्याने कोरोनामुळे आपला एकुलता एक मुलगा गमवला. या मुलाच्या भविष्यासाठी संबंधित दाम्पत्याने 15 लाख रुपयांची एफडी केली होती. मात्र ज्याच्यासाठी पैसा जमवला तोच न राहिल्याने त्यांनी हे सर्व पैसे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या कामानंतर त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या मुलासाठी कमवलेला पैसा त्याच्या मृत्यूनंतर अशा कारणासाठी वापरला ज्यानंतर कोणालाही अभिमान वाटेल. जोडप्यामधील आईचं नाव कल्पना मेहता तर वडिलाचं नाव रसिक मेहता असं आहे.

आपल्या मुलावर आलेली वेळ दुसऱ्या कोणाच्या मुलावर न यावी यासाठी या दाम्पत्याने हा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी 200 पेक्षा जास्त रुग्णांना आयसोलेशनमध्ये किट आणि इतर सामान वाटप केलं. एवढंच नाही तर त्यांनी 350 पेक्षा जास्त लोकांना त्या पैशातून लसीकरणही केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी शहानवाज शेख नावाच्या एका तरुणाच्या मित्राच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मित्राच्या बहिणीचा रिक्षामध्येच मृत्यू झाला. ही गोष्ट दुसऱ्या कोणासोबत न व्हावी यासाठी त्याने स्वतःची फोर्ड एंडेव्हर ही कार विकली. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांने 60 ऑक्सिजन सिलिंडर खऱेदी केले. तर आणखी 40 सिलिंडर भाड्याने घेतले होते.

थोडक्यात बातम्या-

कंगणाने केलं पाकिस्तानचं कौतुक, नेटकऱ्यांचा पारा चढला

रॉकस्टार जडेजा! जडेजाने एका षटकात काढल्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा, पाहा व्हिडीओ

ऊसाच्या रसावर भन्नाट रॅप; गावातल्या पोरांच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकुळ, पाहा व्हिडीओ

पत्नीसाठी रुग्णवाहिकेची वाट पाहून वैतागलेल्या पतीने केलं ‘हे’ कृत्य

“मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेमध्ये दहा वर्षात जी प्रगती केली नाही ती मोदींनी पाच वर्षात केली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More