बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तालिबानी सरकार आणि योगी सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक”

औरंगाबाद | सध्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं पहायला मिळतय. अशातच आता काॅंग्रसेच्या खासदार रजनी पाटील यांनी केंद्र सरकार आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक आहे. दोन्ही सरकार समान अत्याचार करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी केला आहे. औरंंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना रजनी पाटील यांनी या योगी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

पुढे रजनी पाटील यांनी म्हटलं की, योगी सरकारच्या काळात खूप अत्याचार होत असून शेतकऱ्यांचं आंदोलनही चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय प्रियंका गांधीनाही अटक केलं आहे. योगी सरकारच्या काळात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध काॅंग्रसेमधीसमधील महिला आवाज उठल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, मोदी सरकारवर ताशेरे ओढत रजनी पाटील यांनी म्हटलं की, ‘बेटी पढाओ, बेटी बचाव’ असं म्हणत भाजप नेहमी घोषणा देत असतं. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यांना अशा घोषणा देताना लाजही वाटत नाही.

थोडक्यात बातम्या – 

जम्मू-काश्मिरमध्ये दोन तासात तीन दहशतवादी हल्ले; तब्बल एवढे लोक मृत्यूमुखी!

रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड

”हा स्वातंत्र्याचा रक्त महोत्सव म्हणायचा का?” संजय राऊतांचा भाजप सरकारला संतप्त सवाल

‘एवढ्या मोठ्या क्रुझमध्ये फक्त आर्यन फिरत होता का?’ आर्यनच्या अटकेवर मिका सिंहचा सवाल

“प्रत्येक नागरिकाला आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More