बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भावोजींच्या प्रेमापोटी मेहुणीनं आपल्या पतीसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

पाटणा | प्रेमापोटी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात एक वेगळाच आणि धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. आपल्या भावोजींच्या प्रेमात वेड्या झालेल्या मेहुणीने आपल्याच पतीची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

बाबुल नावाच्या एका व्यक्तीचा आठ महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पण नंतर बाबुलच्या पत्नीचं आणि तिच्या भाऊजींचं प्रेम प्रकरण जुळलं. पूर्णिया जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कालीगंज येथून मंगळवारी सायंकाळच्या सुमारास स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांनी सायकलस्वार बाबुलचं अपहरण केलं. अपहरणकर्त्यांनी त्याला धमदाहा येथे नेत असताना वाटेतच त्याचा गळा आवळून हत्या केली. यानंतर बाबुलचा मृतदेह धमदाहा तुलसी कुडीया येथे फेकून दिला होता.

तुलसी कुडीया येथे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मुफस्सिल पोलिसांना बाबुलच्या अपहरणाची माहिती मिळाली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना बाबुलचा मृतदेह आढळून आला. ज्या स्कॉर्पिओतून बाबुलचं अपहरण करण्यात आलं होतं ती जप्त करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी बाबुलची पत्नी तिच्या भावोजींसह चौघांना ताब्यात घेतलं. यानंतर चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला.

दरम्यान, बाबुलच्या आईने बाबुलच्या पत्नीवर हत्येचा आरोप केला होता. बाबुलच्या पत्नीचे आपल्या भावोजींसोबत अनैतिक संबंध होते. यावरुन पंचायत सुद्धा बसवण्यात आली होती मात्र पंचायतीसमोर तिच्या भावोजींनी असं काही नाही असं म्हटलं, असा खुलासा बाबुलच्या आईने केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“जनतेने सहकार्य करावं, आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही”

“फडणवीस पाच वर्षे तरी विरोधी पक्षनेते म्हणून टिकतील का?”

‘नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करा’; मुख्यमंत्र्यांचे आदेश

“बंद काळात रिकाम्या थाळ्या वाजवून पोट भरणार नाही, भरलेल्या थाळ्याच द्याव्या लागतील”

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More