बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देणे हा एकच पर्याय”

मुंबई | गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणाचा मुद्दा बनलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अखेर रद्द केलं आहे. या सर्व प्रकरणात काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या अंतिम सुनावणीदरम्यान 50 टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा घटनात्मक अधिकार राज्यांना नाही, असं कोर्टाने नमूद केलं. तसेच इंद्रा सहानी प्रकरणात फेरतपास होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

शैक्षणिक, सामाजिक मागासवर्गात आरक्षण देण्याचा कलम 21 नुसारचा निर्णय घटनाबाह्य असल्याचं निकालात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं जाऊ शकतं, हा एकच पर्याय राहिला असल्याचं स्पष्ट होत आहे.

न्यायमूर्ती भूषण यांनी काल मराठा आरक्षणावर अंतिम निकाल दिला. यामध्ये सामाजिक आर्थिक मागासवर्गांमध्ये जातींचा समावेश करण्याचा अधिकार राज्यांना असू शकत नाही. तर मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशीनुसार हा निर्णय राष्ट्रपती घेऊ शकतात, असं म्हटलं आहे. यावेळी निकाल देताना 9 सप्टेंबर 2020 पर्यंत झालेल्या वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश आणि नियुक्त्या कायम ठेवण्यास न्‍यायालयाने मंजुरी दिली आहे.

मराठा आरक्षणावर निकाल आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक टीकाटिप्पणीला उधाण आल्याचं पाहायला मिळालं. तसेच स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. मराठा आरक्षणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

आसामच्या मुख्यमंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार?; भाजपमध्ये संभ्रम

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातील ‘या’ 7 शहरात’ महिंद्रांनी सुरू केली ‘ऑक्सिजन ऑन व्हिल’ सेवा

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ; निवडणूक संपताच दरवाढीला सुरुवात

मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं सरकारनं बंद करावं – चंद्रकांत पाटील

चिंता वाढली! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येसह मृतांच्या संख्येत लक्षणीय वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More