बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

पुणे |  पुण्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सैन्यात ब्रिगेडियर पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यानं रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील एएफएमसीमध्ये ब्रिगेडियर पदावर कार्यरत असणारे अनंत नाईक यांचा तो मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी नाईक त्यांच्या सरकारी गाडीतून पुणे रेल्वे स्टेशन येथे आले होते.

अनंत नाईक काल सकाळी चालक बोडके यांच्यासोबत सरकारी गाडीनं पुणे रेल्वे स्टेशनवर आले होते. चालक बोडके यांना मी एमसीओ मधून जाऊन येतो असं सांगून ते पुणे रेल्वे स्टेशनमध्ये गेले. त्यांनी सकाळी 12:15 च्या सुमारास उद्यान एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या पुढे येऊन आत्महत्या केली. ही घटना रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर घडली आहे.

घटनेनंतर, मृत अनंत नाईक यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुसाईड नोट सापडली नाही. त्यांच्या आत्महत्येची माहिती त्यांचा मुलगा अभिषेक नाईक यांना फोनवर कळवण्यात आली आहे. अभिषेक यांनी आपण आल्यानंतरच वडिलांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याची विनंती केली आहे. त्यामुळं अनंत नाईक यांच्या मृतदेहाचं आज शवविच्छेदन होणार आहे.

दरम्यान, ब्रिगेडियर नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. त्याचं नाव संतोष कांबळे आहे. तो व्यवसायाने पाणी पुरवठ्याचं काम करतो. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मृत नाईक हे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर फिरत असताना दिसत आहेत. तसच त्यांनी चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही असं सीसीटीव्हीत दिसत आहे. तेव्हा घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पुणे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी स्वतः घटनास्थळाला, एएफएमसी आणि त्यांच्या कार्यालयाला भेट दिली. ते स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या

‘तो दारु पिऊन दिवसभर वावरात पडलेला असतो’; भाजपच्या ‘या’ आमदारावर गायकवाडांची टीका

घरातून येत होता कुजलेला वास, दरवाजा तोडताच समोर दिसला धक्कादायक प्रकार

“अरे ओ बेटा जी…”; ….म्हणून सेहवागनं प्रिती झिंटाला केलं ट्रोल

कोरोनाची लस घेतल्यानंतर ‘या’ गोष्टी खाल्ल्याने होणार नाही साईड इफेक्ट

‘देशात अभूतपूर्व आणि युद्धसदृश परिस्थिती’; संजय राऊत यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More