Top News महाराष्ट्र मुंबई

मराठी लेखिका शोभा देशपांडेंचा लढा यशस्वी; अखेर मुजोर सराफानं मागितली माफी!

मुंबई | मराठीचा आग्रह धरल्याने अपमानास्पद वागणूक मिळाल्याने लेखिका शोभा देशपांडे यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. २० तासानंतर मुजोर सराफानं अखेर त्यांची माफी मागितली आहे.

मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईतच झाला आहे, मला माफ करा, असं सांगत महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली. मनसेचे कार्यकर्त्यांनी दणका दाखवल्यानंतर हा सराफ वठणीवर आला.

दरम्यान, शोभा देशपांडे काल रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी संदीप देशपांडे घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस एका गाडीतून ज्वेलरला घेऊन घटनासाठीस्थळी आले. त्यानंतर त्याने माफी मागितली, यावेळी मनसैनिक आक्रमक झाले होते.

दरम्यान, ज्वेलरनं माफी मागितली असली तरी शोभा देशपांडे मालकाने परवाना दाखवावा या मागणीवर त्या ठाम आहेत, मात्र शोभा देशपांडे यांचं वय आणि त्या कालपासून उपाशी असल्यानं पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

खडसेंनी बंद खोलीत आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही, पण…- चंद्रकांत पाटील

…म्हणून दोन पोलिसांना सक्तीची निवृत्ती; 15 पोलिसांच्या वेतनात कपात!

“मंदिर नाही, मदिरा सुरु; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा थोडा तरी मान ठेवा”

प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर खासदार संभाजी राजेंचं उत्तर, म्हणाले…

“गरीब-दलित वर्गाने आज एक बुलंद राजकीय आवाज गमावला”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या