नवी दिल्ली। रागावर ताबा नसल्याने दिल्लीतील पश्चिम विहारमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शेजाऱ्यांचा कुत्रा भुंकला म्हणून तिथल्या एका रहिवाशाने कुत्र्यावर आणि तीन जणांवर लोखंडी रॉडने हल्ला केला आहे.
धरमवीर दहिया हे सकाळी फिरायला गेले होते. त्यावेळेस तिथल्या स्थानिक रहिवासी रक्षित यांचा पाळीव कुत्रा दहिया यांच्यावर भुंकला. दरम्यान दहिया यांना राग अनावर झाला आणि त्यांनी या कुत्र्याच्या शेपटीला धरून उचललं आणि त्याला जमिनीवर फेकून दिलं .
दहिया कुत्र्यावर हाल करत असताना कुत्र्याचा मालक रक्षित कुत्र्याला वाचवायला आले. तेव्हा दहियाने मालक रक्षित यांना मारायला सुरूवात केली. त्यानंतर दहिया लोखंडी रॉड (Iron Rod) घेऊन आला आणि त्यानं कुत्र्याच्या डोक्यावर तो रॉड मारला. त्यानंतर परत वाद झाला.
चिडलेल्या दहियाने रक्षित आणि त्याच्या कुटुंबातील एका महिलेलाही या रॉडने मारहाण केली. या भांडणात मध्यस्थी करणारा दुसरा शेजारी हेमंत यालाही दहियाने लोखंडी रॉडने मारहाण केली.
थोडक्यात बातम्या-
‘काय ती शायरी, काय ती अदाकारी…’, चित्रा वाघ यांचा राऊतांना शहाजी बापू स्टाईल टोला
‘काली’ चित्रपट प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाचा निर्मात्यांना दणका
शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का, आमदारांपाठोपाठ नगरसेवकही शिंदे गटात
लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर
‘… तरी शिवसेनेला 100 हून अधिक जागा मिळतील’, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.