बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पगार थकवला म्हणुन मालकाच्या गाडीला लावली आग; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवडमध्ये नेहमीच काही ना काही गुन्हे घडतच असतात. त्यातच आता चिंचवडच्या एका बहाद्दराने मालकाने पगार थकवला म्हणुन थेट मालकाच्या दुचाकीला भररस्त्यात आग लावली आहे. ही घटना रविवारी पिंपरी-चिंचवड लिंक रोडवर असलेल्या प्रदिप स्विट्ससमोर घडली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

दरम्यान, आरोपी अंकीत यादव हा गणेश उंदरे पाटील यांच्या सिमेंट ब्लाॅक बनवण्याच्या कारखान्यात कामाला होता. परंतू, मालकाने त्याचे कामाचे हक्काचे पैसे दिले नाही, म्हणून रागाच्या भरात आणि दारूच्या नशेत त्याने मालकाची गाडी पळवून ती भर रस्त्यात पेटवून दिली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्येच एका ड्रायव्हरने मालकाच्या गाडीला आग लावल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

आरोपीला त्याच्या कामाचे 40 हजार रुपये उंदरे यांनी दिले नाही त्याच्याच रागात दारू पिऊन त्याने हे कृत्य केलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी अंकीत यादव याला अटक केली असून पुढील तपास सूरू आहे. पण असे प्रकार सतत घडत असतील तर कायद्याची भीती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

“हा मोदींचा नवीन भारत आहे, इथे गुन्हेगारांना दंड दिला जातो मग तुमचा बाप कोणीही असो”

आर्यन खानने ‘या’ ठिकाणी लपवले होते ड्रग्ज; धक्कादायक माहिती समोर

‘या’ कारणामुळे प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

शाहरुखला सपोर्ट करण्यासाठी सलमान धावला, रात्री उशिरा मन्नतवर पोहोचला

आर्यन खानच्या जामीनाबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More