मुबंई | मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्र आणि मुंबईकरांकडून मोदींचं स्वागत करण्यात आलं. यानंतर मोदींनी जनतेशी संवाद साधला. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
यावेळी बोलताना मोदींनी शिंदे आणि फडणवीस यांच्या कामाचं आणि त्यांच्या जोडीचं कौतुक केल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अनेक विकास कामं महाराष्ट्रात झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे शिंदे आणि फडणवीसांची जोडी तुमची स्वप्न पूर्ण करतील असं आश्वासन देत मोदींनी भाषणाची सांगता केली.
यावेळी बोलताना केेंद्र सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवायला मोदी विसरले नाहीत. मुंबईला भविष्यात आणखीन विकसनशील बनवण्याचं स्वप्न असल्याचं मोदी म्हणाले. मेट्रोच्या कामात मध्यंतरी काही कारणास्तव अडथळा आला. तो प्रकल्प थांबला होता. जनतेने जेव्हा शिंदे-फडणवीस सरकारला कौल दिला तेव्हा ही काम पुन्हा सुरु झाली असं म्हणत मोदींनी कौतुक केलं.
या सगळ्या विकास कामांसाठी भाजप नेहमीच तयार असेल. त्यामुळे मुंबईला विकसित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार समर्थ आहे, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या