बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पक्षाला अध्यक्षच नाही मग निर्णय कोण घेतंय?, आता किती दिवस थांबायचं?”

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला खिंडार पडल्याचं दिसत आहे. गेल्या काही महिन्यात अनेक नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यातच आता पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. अशातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

पक्षातील आमचे लोक आम्हाला सोडून जात आहे. सुष्मिताजी पार्टी सोडून निघून गेल्या. फेलेरियो , सिंधिया, सुधीरन, जितिन प्रसाद त्याचबरोबर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. आता प्रश्न पडतो की, ते का सोडत आहेत? आपलीच काही चुक असल्याने हे सर्व नेते पक्ष सोडून जात आहे. माझ्या मते पक्षाला नेतृत्व नसल्याने अनेक नेते पक्ष सोडून जात आहे, असंही कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने पक्षाला आणखी मजबूत करण्याचा विचार केला पाहिजे. ज्यांनी पक्ष सोडला, त्यांनाही पक्षात आणण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आपल्याला मुक्त संवाद संभाषण आवश्यक आहे. आम्ही काँग्रेस कमकुवत होताना पाहू शकत नाही त्यामुळे पक्षाला नेतृत्व हवं आहे. आता किती दिवस थांबायचं?, असंही सिब्बल यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, मागील वर्षी आम्ही हायकमांडला पत्र पाठवलं होतं. त्या सर्व नेत्यांच्या बाजूने मी बोलतोय. त्यावर आता आम्ही हायकमांडच्या कारवाईची वाट पाहत आहे, असंही सिब्बल म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

मराठवाड्यात अतिवृष्टीनं हाहाकार! 436 नागरिकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरे करणार पाहणी दौरा

“लायकीत राहा अन् दम असेल तर समोर या, शिवसेना काय आहे ते दाखवून देऊ”

तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल तर… – राहुल गांधी

“हे तर ओल्या दुष्काळाचे संकेत, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा”

“…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलं भारतीय संघाचा मेन्टाॅर”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More