बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांवर पक्षाने सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई | राज्यातील सत्ता हातातून गेली तरी देवेंद्र फडणवीस यांचं पक्षातील स्थान कायम आहे. भाजपच्या भविष्यातील मोठ्या नेत्यांमध्ये फडणवीस यांची गणना होत असते. त्यांच्यावर पक्ष नेहमी राष्ट्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या सोपवताना पहायला मिळालं आहे. आताही एक मोठी जबाबदारी फडणवीस यांच्यावर सोपावण्यात आली आहे.

आगामी काळात 2022 मध्ये देशातील 5 राज्यातील निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने सर्व पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरूवात केली आहे. भाजपने या पाच राज्यातील निवडणुकांसाठी प्रभारींची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची गोवा राज्याच्या विधानसभा प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे.

पक्ष संघटनेवर मजबुत पकड असणाऱ्या नेत्यांमध्ये फडणवीस यांची गणना होते. या अगोदर 2020 मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाचे प्रभारी म्हणून फडणवीस यांनी यशस्वी जबाबदारी सांभाळली आहे. भाजपला फडणवीस यांच्या प्रभारी पदाच्या काळात बिहारमध्ये 70 जागा जिंकता आल्या होत्या. भाजपने बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे.

आता गोव्यात फडणवीस काय करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर या ठिकाणी भाजप पक्ष सत्तेत असूनही जागा जिंकण्यात कमी पडली होती. काॅंग्रेस पक्षाला गोव्यात 17 आमदार निवडून आणता आले होते. या गोव्यात आता फडणवीसांची जादू चालणार का? हा प्रश्न आहे.

थोडक्यात बातम्या 

भाजप खासदाराच्या सुनेचा थेट चाकणकरांना फोन, म्हणाल्या, ‘प्लीज ताई माझी सुटका करा’

“तालिबानशी चर्चा करणारं मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी का बोलत नाही?”

“रोज बारामतीला नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात”

राज्यात आज कुठे कुठे पाऊस होणार?, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“तरीही मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More