बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पक्षाला सुधारणांची गरज, निवडणुकांच्या निकालांवरून स्पष्ट- सोनिया गांधी

नवी दिल्ली | देशात नुकत्याच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. यांमध्ये भाजपने यश मिळवलं पण विरोधी पक्ष काँग्रेसला सत्ता तर मिळाली नाही पण आसाम पण हातातून गेलं. पोटनिवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचाच सामना करावा लागला. या निकालावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या बैठकीत बोलत होत्या.

आपल्याला या गंभीर परिस्थितीची दखल घेण्याची गरज आहे. आपण खुप निराश आहोत हे म्हणणंदेखील कमी ठरेल, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यासाठी एक टीम तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. तसंच त्यांच्याकडून त्वरित रिपोर्ट घेण्यात यावा, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.

केरळ आणि आसाममधील विद्यमान सरकारला सत्तेतून काढून टाकण्यासाठी आपण का अयशस्वी झालो?, बंगालमध्ये आपलं खातं का उघडलं नाही?, हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवही टीका केली.

दरम्यान, मोदी सरकारनं कोरोना महासाथीबाबत निष्काळजीपणा केला आणि सुपर स्प्रेडर कार्यक्रमांना जाणूबुजून परवानगी दिली. त्याची किंमत आज देशाला भोगावी लागत आहे. देशातील आरोग्य व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. लसीकरण मोहीम मंदगतीने चालक असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल’; एकतर्फी प्रेमातून युवकाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी

‘आजी वारल्याचं का सांगितलं नाही?’; तरुणाला दोघा आत्तेभावांकडून जबर मारहाण

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमधील या खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन 

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, मग केंद्र सरकार काय करतंय?”

“संजय राऊतांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही अन् ‘सामना’ही वाचत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More