पालघर | रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बोईसरमध्ये घडली आहे. चंद्रकांत चौधरी असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.
चंद्रकांत चौधरी बोईसर येथील शुक्ला कंपाऊंड येथे राहत होते. या घटनेमुळे बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
चौधरी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करुन डॉक्टरांनी उपचार केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चौधरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी बोईसर पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
“मी महाराष्ट्रात सुरक्षित आहे, उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली”
सरदार तारासिंग यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपला- देवेंद्र फडणवीस
राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण; स्वतः ट्विट करुन दिली माहिती
IPL2020- नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जची प्रथम गोलंदाजी
“पहाटेचा शपथविधी यशस्वी न होणं हीच फडणवीसांची खंत”
Comments are closed.